top of page

Two Day Theater Workshop

Aug 25
1 min read

Updated: Aug 27

दोन दिवसीय विशेष नाट्य कार्यशाळा | ठाणे आर्ट गिल्ड

ठाणे आर्ट गिल्ड (TAG) दरवर्षी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करते. यंदाच्या एकांकिका स्पर्धेच्या तयारीसाठी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी दोन दिवसीय विशेष नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा 5 आणि 6 सप्टेंबर 2026 (शनिवार आणि रविवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचा उद्देश सहभागी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना एकांकिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय तसेच रंगभूमीवरील सादरीकरणाच्या विविध पैलूंची अधिक प्रभावीपणे तयारी करून देणे हा आहे. आगामी एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.

TAG सदस्यांसाठी कार्यशाळा विनामूल्य

ठाणे आर्ट गिल्डच्या सदस्यांसाठी ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. मात्र, शिबिरार्थींची संख्या मर्यादित असल्याने नाट्यविषयात रुची असणाऱ्या आणि कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी त्वरित नोंदणी करावी.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:महेश शानभाग – 9323781863

लेखक | दिग्दर्शक | कलाकार | नाट्यप्रेमी एकांकिका स्पर्धेपूर्वी स्वतःला अधिक सक्षम करण्याची ही उत्तम संधी आहे.

आजच नोंदणी करा आणि रंगभूमीवरील आपल्या पुढील सादरीकरणासाठी सज्ज व्हा!



 
 
 

Recent Posts

See All
TAGSFF 2026

THANE ART GUILD SHORT FILM FESTIVAL- 2026 (National Short Film Competition) Rules & Regulations This Short Film Festival (TAGSFF) is organized by Thane Art Guild (TAG/ Organisers), Thane,

 
 

Comments


bottom of page